Saturday, 13 December 2025

नव्या सुधारित योजनेनुसार दिव्यांग – अव्यंग विवाहासाठी १.५ लाख

 दिव्यांग कल्याण मंत्री सावे म्हणाले कीनव्या सुधारित योजनेनुसार दिव्यांग – अव्यंग विवाहासाठी १.५ लाख रुपयेतर दिव्यांग – दिव्यांग विवाहासाठी २.५ लाख रुपये इतके अनुदान मिळणार आहे. ही रक्कम पती-पत्नीच्या संयुक्त बँक खात्यात थेट लाभहस्तांतरण (डीबीटीप्रणालीद्वारे जमा केली जाणार असूनत्यापैकी ५० टक्के रक्कम दाम्पत्याने पाच वर्षांकरिता मुदतठेवीत ठेवणे अनिवार्य राहील. दिव्यांग व्यक्तींच्या विवाहातून मिळणारे भावनिकमानसिक आणि सामाजिक स्थैर्य लक्षात घेता अनुदानवाढ गरजेची होती. शासनाचा हा निर्णय भारतीय संविधानातील न्यायस्वातंत्र्यसमानताबंधुता आणि प्रतिष्ठा या मूल्यांना अधोरेखित करणारा असूनसमाज अधिक सर्वसमावेशक करण्यास मदत करणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi