Thursday, 11 December 2025

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंतनवीन रस्ता निर्मितीस मान्यता;

 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंतनवीन रस्ता निर्मितीस मान्यता;

तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात

ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात

      - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तुळापूर व मौजे वढू बु. विकास आराखडा शिखर समिती बैठक

नागपूरदि. 10 : स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे जिल्ह्यातील बलिदान स्थळ तुळापूर (ता. हवेली) व समाधी स्थळ मौजे वढू बुद्रुक (ता. शिरूर) दरम्यान नवीन रस्त्याची निर्मिती व भीमा नदीवरील पूल विकासकामांचा अंतर्भाव असलेल्या 532.51 कोटी किमतीच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहे. या दैवताचे बलिदान स्थळ असलेल्या तुळापूर आणि समाधी स्थळ असलेल्या वढू बुद्रुक येथील विकास आराखडा राबविताना ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घ्याव्यातअसे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi