Saturday, 13 December 2025

पुणे जिल्ह्यातील मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी ११ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन

 पुणे जिल्ह्यातील मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी

११ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन

- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

नागपूरदि. १२ : पुणे जिल्ह्यातील मौजे मंगरूळ येथे गट क्रमांक 363738 तसेच 354142 आणि 46 या भागांत खाणपट्ट्यांच्या मर्यादेपेक्षा तब्बल ९० हजार ब्रास अधिक उत्खनन झाल्याचे ईटीएस सर्व्हेवरुन निदर्शनास आले आहे. याप्रकरणी विभागीय आयुक्तांमार्फत दुसऱ्यांदा चौकशी केल्यानंतर स्थानिक महसूल अधिकाऱ्यांनी जबाबदारी पार न पाडल्याचे उघड झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

            यासंदर्भात विधानसभा सदस्य सुनील शेळके यांनी लक्षवेधी सूचना मांडली.

            महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले कीपुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील मौजे मंगरूळ येथे उत्खननाची परवानगी 3 लाख 63 हजार ब्रास इतकी असतानाही 4 लाख 54 हजार ब्रास उत्खनन झाल्याचे आढळले.

            यासंदर्भातविभागीय आयुक्तांमार्फत नव्याने चौकशी केली असतातपासात उत्खननाचे प्रमाण परवानगीपेक्षा अत्यंत जास्त असल्याचे आणि स्थानिक महसूल अधिकाऱ्यांनी जबाबदारी पार न पाडल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अवैध उत्खनन होत असताना जबाबदारी न निभावणाऱ्या संबंधित तलाठीमंडळ अधिकारी आणि तहसीलदारावर तत्काळ निलंबन कारवाई जाहीर करण्यात आली. त्याचबरोबरयासंदर्भात विभागीय आयुक्त यांनी दिलेला पहिल्या अहवालाची तपासणी मुख्य सचिवांमार्फत करण्यात येईल.

            या निलंबन केलेल्या अधिकाऱ्यांवर तीन महिन्यांत विभागीय चौकशी पूर्ण केली जाणार असून चौकशी अहवाल पुढील अधिवेशनात पटलावर ठेवण्यात येईलअसे सांगून मंत्री बावनकुळे म्हणाले कीयात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन दंड व व्याजासह रक्कम वसूल करण्यात येईल. त्याचबरोबरसातबारा नोंदीवर नोंद आणि दंड न भरल्यास सातबारा नोंदीवर कायमस्वरूपी नोंद राहणार राहणार आहे.

            अवैध उत्खनन रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात ईटीएस सर्वे सुरू करण्यात येणार असल्याचे सांगून मंत्री बावनकुळे म्हणाले कीप्रत्येक जिल्हातालुका आणि गावात परवानगी व प्रत्यक्ष उत्खननाचा सविस्तर तुलनात्मक अहवाल तयार केला जाणार आहे.

            या लक्षवेधी सुचनेत सदस्य सुधीर मुनगंटीवारबाबासाहेब देशमुखसमाधान आवताडे यांनीही उपप्रश्न विचारले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi