Thursday, 25 December 2025

भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार

 भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा

 सकारात्मक विचार करणार

-         महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि.२३ : भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा शासनस्तरावर सकारात्मक विचार केला जाईलअसे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमि अभिलेख विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांच्या संघटनासमवेत झालेल्या बैठकीत सांगितले.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्यासह महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी व भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जमीन मोजणीसाठी आवश्यक अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याच्या सूचना करतमहसूल मंत्री बावनकुळे म्हणालेभूमी अभिलेख विभागाकडील भू-करमापक पदाच्या वेतनश्रेणीबाबत केलेल्या मागणीबाबत विशेष बाब म्हणून मंत्रिमंडळस्तरावर प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही केली जाईल. तलाठी  संवर्गात ज्या प्रमाणे प्रवास भत्ता दिला जातो त्या प्रमाणे प्रवास भत्ता देणेबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi