भिवंडी येथे डम्पिंग ग्राउंडसाठी जागा निश्चित
- मंत्री डॉ.उदय सामंत
नागपूर, दि. 12 : भिवंडी शहरातील सर्वे क्रमांक 130 आणि सर्वे क्रमांक 139 ही जागा नवीन डम्पिंग ग्राउंडसाठी अंतिम करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केल्यानुसार या ठिकाणी नवीन डम्पिंग ग्राउंड उभारण्याचा प्रस्ताव शासन मंजूर करेल, अशी माहिती मंत्री डॉ.उदय सामंत यांनी दिली.
यासंदर्भात विधानसभा सदस्य रईस शेख यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
या सूचनेच्या उत्तरात मंत्री डॉ.सामंत म्हणाले की, विद्यमान ‘डम्पिंग ग्राउंड’ शहरालगत तसेच वस्तीलगत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ नये यासाठी पर्याय म्हणून नवीन जागा निश्चित करणे अत्यावश्यक झाले आहे.
मंत्री डॉ.सामंत म्हणाले की, शहरात येणाऱ्या कचऱ्याच्या उघड्या गाड्यांमुळे होणारा त्रास थांबवण्यावरही भर देण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर, यासंदर्भात शासनाने एनजीटीच्या नियमांनुसार तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येणार असून अधिवेशन संपल्यानंतर 15 दिवसांच्या आत विभागीय आयुक्त, संबंधित अधिकारी आणि स्थानिक सदस्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन पुढील उपाययोजनांचा आढावा घेतला जाईल. तसेच विभागीय आयुक्तांना प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्याचेही निर्देश देण्यात येणार असल्याचे मंत्री डॉ.सामंत म्हणाले.
No comments:
Post a Comment