आदिवासी बांधवांसोबत वनजागेवरील
२५ हजार झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी धोरण
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पुनर्वसनाला गती
नागपूर, दि. ११ : मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी बांधवांचे आणि वनाच्या जागेवरील सुमारे २५ हजार झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यासाठी धोरण तयार केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. यामुळे या उद्यानातील मोठा वनप्रदेश मोकळा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यासंदर्भात विधानसभेत निवेदन करताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले, सद्यस्थितीत उद्यानातील अनेक वसाहती या ना-विकास क्षेत्रात (एनडीझेड) असून न्यायालयाने त्या जागा रिकाम्या करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र दूरस्थ ठिकाणी पुनर्वसन केल्यास स्थानिक रहिवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शासनाने विविध पर्यायांचा अभ्यास करून नव्या धोरणाचा मसुदा तयार केल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment