सागरी सुरक्षेसाठी १५ हाय स्पीड गस्ती नौका लवकरच दाखल होणार
- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे
नागपूर दि. १३ :- परराज्यातून राज्याच्या सागरी क्षेत्रात येणाऱ्या मच्छिमार नौकांमुळे राज्यातील मच्छिमारांचे आर्थिक नुकसान होते. याचा विचार करून या परराज्यातील मच्छिमारी नौकांवर कारवाई करण्यासाठी व किनारपट्टीची सुरक्षा भक्कम करण्याच्या दृष्टीने लवकरच १५ हाय स्पीड गस्ती नौका राज्यात दाखल होणार असल्याची माहिती मस्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते.
मत्स्यव्यवसाय मंत्री राणे म्हणाले की, सध्या गस्तीसाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडे लाकडी बोटी आहेत. या बोटींमधून परराज्यातून आलेल्या मच्छिमार नौकांचा पाठलाग करून त्यांना पकडणे शक्य होत नाही म्हणून हाय स्पीड नौका घेण्यात येत आहेत. त्याशिवाय ड्रोनच्या मदतीने गस्त घातली जात आहे. त्यामाध्यमातून परराज्यातील नौका, अवैध मासेमारी आणि इतर बेकायदेशीर गोष्टींवर नियंत्रण आणले असल्याची माहिती मस्यव्यवसाय मंत्री राणे यांनी दिली
No comments:
Post a Comment