राज्याच्या कर्जस्थितीबाबत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, वित्त आयोगाने घालून दिलेल्या निकषांनुसार राज्याचे काम सुरु आहे. वर्ष अखेरीस खर्चावर नियंत्रण ठेवून व आर्थिक शिस्त पाळून वित्तीय निर्देशांकांचे पालन करण्यात राज्य शासन नेहमीच यशस्वी झाले आहे. चालू वर्षी देखील पुरवणी मागण्यांमधून तरतूद केली असली तरी उत्पन्नाचे नवीन स्तोत्र तयार करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. वस्तु व सेवाकर (जीएसटी), उत्पादन शुल्क आणि खनिकर्म या विभागाद्वारे मिळणारा महसूल वाढविण्याकरीता आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. याशिवाय संसाधनाच्या क्षमतेचा पूर्ण वापर करुन तसेच वित्तीय शिस्त लावून सुधारित अंदाजातून राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या तीन टक्क्यांच्या मर्यादेत राहील, याची दक्षता घेण्यात येईल, असे नमूद करुन राज्याची वित्तीय शिस्त कुठेही बिघडली नसल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
*****
No comments:
Post a Comment