Tuesday, 30 December 2025

राज्यातील आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी बृहत आराखडा तयार करा

 राज्यातील आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी बृहत आराखडा तयार करा

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

बांधकामाधिन रुग्णालयांच्या इमारत कामांचा आढावा

 

नागपूरदि. 10 : राज्यात लोकसंख्यानिहाय आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा रुग्णालयापर्यंत बळकटीकरणावर भर देत  दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी राज्याच्या बृहत आराखडा तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

          विधान भवन येथे समिती कक्षात आरोग्य विभागाच्या बांधकामाधीन इमारतींचा आढावा बैठकीत आरोग्यमंत्री श्री आबिटकर बोलत होते.

          आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणाले कीराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात उभारण्यात आलेल्या आरोग्य संस्थांच्या इमारतींचा रुग्णसेवेत उपयोग करावा. मागणीप्रमाणे आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन करण्यात यावे. आरोग्य संस्थांच्या इमारतींची अंदाजपत्रके तपासून घेण्यात यावीत. रुग्णालयांमध्ये स्वच्छतारुग्णांना मिळणार आहार आणि मनुष्यबळ याबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही. स्वच्छतेबाबत कटाक्षाने कारवाई करावी. स्वच्छतेच्या कामासाठी नियुक्त  कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्यावे. कामात व्यत्यय आणून काम बंद पाडणाऱ्या तसेच कामात कुचराई करीत असलेल्या कंत्राटदारांना काळे यादीत टाकावे संबंधित दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi