जुन्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी कमी दराने
निविदा भरण्याच्या प्रकरणाची चौकशी करणार
- मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. 10 : म्हाडाच्या जुन्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी कमी दराने निविदा भरण्याच्या प्रकारांची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
दक्षिण मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकास संदर्भात सदस्य अमीन पटेल यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर मंत्री श्री. देसाई यांनी ही माहिती दिली.
श्री. देसाई यांनी सांगितले की, दक्षिण मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकास संदर्भात म्हाडाच्या कलम 79 अ अंतर्गत बजावलेल्या नोटीसी विरोधात उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पिटीशन दाखल करण्यात आले असून म्हाडाची बाजू भक्कमपणे मांडण्यात येत आहे. उमरखाडी येथील 81 इमारतीचा पुनर्विकास दोन टप्प्यात करण्यासंदर्भात व्यवहार्यता तपासण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या चर्चेत सदस्य श्री. पटेल, कॅप्टन तमील सेलवन, अजय चौधरी, श्री. सावंत यांनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment