पालघर येथील लिंबाने सॉल्ट उद्योगातील दुर्घटनेची सखोल चौकशी
- कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर
नागपूर, दि. १२ : पालघर तालुक्यातील लिंबाने सॉल्ट इंडस्ट्रीमध्ये १८ तारखेला झालेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. मृत व जखमी कामगारांना योग्य नुकसानभरपाई मिळण्यासाठी राज्य शासनाकडून तातडीने उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी विधानसभेत दिली.
सदस्य राजेंद्र गावित यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री अॅड.फुंडकर बोलत होते. सदस्य राजू तोडसाम व नाना पटोले यांनीही चर्चेत सहभाग घेतला.
कामगार मंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, दुर्घटना उत्पादन प्रक्रियेत झालेली नाही. प्रयोगशाळेत वापरण्यात येणाऱ्या निष्क्रिय करावयाचे रसायन नष्ट करताना मेटलशी झालेल्या रासायनिक अभिक्रियेच्या स्फोटामुळे झाली. स्फोटाच्या वेळी मालक स्वतः घटनास्थळी होते. मृत कामगारांसाठी कंपनीच्या ग्रुप इन्शुरन्सद्वारे भरपाई प्रक्रियेचा पाठपुरावा सुरू आहे. तसेच कामगार न्यायालयातून मिळणारी रु. १५ लाखांची भरपाईही देण्याची प्रक्रिया सुरू आहे. जखमी चारही कामगारांचा संपूर्ण उपचार खर्च व्यवस्थापनाकडून करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment