Monday, 29 December 2025

गडचिरोली पोलीस दलाच्या बळकटीसाठी 34 नव्या वाहनांचा ताफा दाखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून वितरण

 वृत्त क्र.4738

गडचिरोली पोलीस दलाच्या बळकटीसाठी 34 नव्या वाहनांचा ताफा दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून वितरण

 

गडचिरोली, (जिमाका) दि. 27 - गडचिरोली जिल्ह्यातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षमगतिमान व प्रभावी करण्याच्या दृष्टीने गडचिरोली पोलीस विभागाला 30 स्कॉर्पिओ वाहने, 2 बस व मोटारसायकल असा एकूण 34 वाहनांचा ताफा उपलब्ध करून देण्यात आला. या नव्या वाहनांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले.

कार्यक्रमाला वित्तनियोजनकृषीमदत व पुनर्वसनविधी व न्यायकामगार राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री अॅड आशिष जयस्वालगृह (ग्रामीण)गृहनिर्माणशालेय शिक्षणसहकारखनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरआमदार डॉ. मिलिंद नरोटे नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटीलपोलीस उपमहानिरीक्षक अंकीत गोयलजिल्हाधिकारी अविश्यांत पंडाजिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल उपस्थित होते.

या वाहनांमुळे दुर्गम व आदिवासी भागात जलद गस्तआपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसादनक्षलविरोधी मोहिमातसेच दैनंदिन पोलीस कामकाज अधिक कार्यक्षमतेने पार पाडणे शक्य होणार आहे. स्कॉर्पिओ वाहने गस्त व ऑपरेशनल कामांसाठी उपयुक्त ठरणार असूनबस वाहनांचा उपयोग पोलीस पथकांच्या वाहतुकीसाठी तसेच विशेष मोहिमांसाठी होणार आहे. मोटारसायकलींमुळे अरुंद व दुर्गम मार्गांवरही पोलीस उपस्थिती वाढण्यास मदत मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi