वाचन संस्कृती जोपासण्याची गरज — राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले की, आजच्या काळात वाचनाची गरज सर्वाधिक आहे आणि त्या जाणिवेतून हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. डिजिटल माध्यमामुळे वाचनाला धोका निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या पुस्तक महोत्सवाचे महत्त्व अधिक आहे. वाचन संस्कृती जोपासण्याची गरज आहे. या महोत्सवात 300 हून अधिक प्रकाशक आणि 15 लाखांहून अधिक पुस्तके उपलब्ध आहेत. परिसरातील विद्यार्थी आणि नागरिकांना याचा मोठा फायदा होईल. नागरिकांनी या महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. शिवकथाकार विजयराव देशमुख यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनबीटीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदिका मिश्रा यांनी केले तर आभार प्रदर्शन युवराज मलिक यांनी केले.
No comments:
Post a Comment