Saturday, 22 November 2025

पालकांवर आणि २०२३ मध्ये आशा कर्मचाऱ्यांवर घेतलेल्या सर्वेक्षणांमध्ये

 महाराष्ट्रातील सर्वेक्षणाचे निष्कर्ष

प्रोजेक्ट सुविता २०२५ मध्ये पालकांवर आणि २०२३ मध्ये आशा कर्मचाऱ्यांवर घेतलेल्या सर्वेक्षणांमध्ये पुढील निष्कर्ष समोर आले आहेत. १,१९२ पालकांपैकी ७० टक्के पालकांना सुविताकडून एसएमएस आल्याचे आठवते. त्यापैकी ४८ टक्के पालकांनी संदेशातील विषय (लसीकरण किंवा मातृ आरोग्य) योग्यरीत्या ओळखला. ४० टक्के लाभार्थ्यांनी संदेश अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितलेतर ५.६ टक्के साठी तो प्राथमिक माहितीचा स्रोत ठरला.

९० आशा कर्मचाऱ्यांपैकी ६१ टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की एसएमएस रिमाइंडरमुळे लसीकरणासाठी लाभार्थ्यांना एकत्र करणे अधिक सोपे झाले. त्यापैकी ३६ आशा ताईंनी नमूद केले की काही पालक फक्त एसएमएस मिळाल्यामुळेच आरोग्य केंद्रात आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi