Monday, 24 November 2025

पर्यावरण बदल ही केवळ पुस्तकी चर्चा नसून वास्तवातील मोठी समस्या

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेपर्यावरण बदल ही केवळ पुस्तकी चर्चा नसून वास्तवातील मोठी समस्या आहे. आपण हवामान बदलाचा अनुभव घेणारी पहिली पिढी आहोत आणि त्याबद्दल काहीतरी करू शकणारी शेवटची पिढी आहोत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही प्रदूषणाची सर्वात मोठी कारणे असतातत्यामुळे मुंबईत वाहतूक व्यवस्था इलेक्ट्रिक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मेट्रो संपूर्णपणे इलेक्ट्रिक आहे. पुढील टप्प्यात सार्वजनिक वाहतुकीला पूर्णपणे शून्य-उत्सर्जनच्या दिशेने नेणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेअनेक वर्षे मुंबईचे सांडपाणी थेट समुद्रात सोडले जात होते, मुंबईसारख्या महानगराचा 100 टक्के सीवेज समुद्रात टाकला जाणे योग्य नाही. त्यामुळे नियम तयार करून आता संपूर्ण मुंबईत सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स उभारत आहोत. पुढील वर्षापर्यंत 100 टक्के ट्रीटेड पाणीच समुद्रात सोडले जाईल. त्याचबरोबर धारावीच्या पुनर्विकासात 30 टक्के क्षेत्र पूर्णपणे अनडेव्हलपेबल ठेवले जाणार असून त्यामुळे प्रचंड प्रमाणात ओपन आणि ग्रीन स्पेसेस निर्माण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi