Tuesday, 25 November 2025

गेल्या महिनाभरात भारतीय महिलांनी साध्य केलेल्या तीन विश्वविजयांचा विशेष

 गेल्या महिनाभरात भारतीय महिलांनी साध्य केलेल्या तीन विश्वविजयांचा विशेष उल्लेख करत उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणतात कीदेशातील महिला क्रीडा क्षेत्र अभूतपूर्व उंची गाठत आहे. सर्वप्रथम महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून आयसीसी महिला विश्वचषक जिंकला. त्यानंतर भारतीय अंध महिला क्रिकेट संघाने कोलंबोमध्ये झालेला पहिलाच अंध टी-२० विश्वचषक जिंकला आणि आता महिला कबड्डी विश्वचषकातही भारताने विजेतेपद पटकावले. फक्त महिनाभरात भारताच्या मुलींनी मिळवलेल्या या तीन विश्वविजयांनी संपूर्ण देशाची मान उंचावली आहे. भारतीय महिला क्रीडापटूंच्या कामगिरीचा हा सुवर्णकाळ सुरू झाला असून भारतीय महिलांचा विजयरथ कोणी रोखू शकत नाही. देशातील प्रत्येक मुलीसह खेळाडूंसाठी हा प्रेरणादायी क्षण असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी भारतीय महिला कबड्डी संघातील सर्व खेळाडूप्रशिक्षकसहाय्यक कर्मचारी तसेच खेळाडूंच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi