महापारेषण जनसंपर्क विभागाला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर
· भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय जागृती अभियान विशेष पुरस्कार
मुंबई, दि. २४ : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) जनसंपर्क विभागाला पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील तीन पारितोषिके जाहीर झाली असून यामध्ये भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय जागृती अभियान हा विशेष पुरस्कार तसेच सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया अँड पीआर, सर्वोत्कृष्ट ॲडफिल्म (इंग्रजी) पुरस्कार मिळाला आहे. राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर झाल्याने महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी विभागाचे अभिनंदन केले आहे.
डेहराडून (उत्तराखंड) येथील हॉटेल एमराल्डमध्ये १३ ते १५ डिसेंबरला होणाऱ्या ४७ व्या आंतरराष्ट्रीय जनसंपर्क महोत्सवाच्या उदघाटन समारंभात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
महापारेषणच्या जनसंपर्क विभागाची विविध पुरस्कारासाठी निवड करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत व बहिर्गत संपर्कासाठी राबविलेले उपक्रम, महापारेषण समाचार या गृहमासिकातील डिजिटल बदल, क्यू-आर कोड तसेच इतर डिजिटल माध्यमांचा सकारात्मक पध्दतीने वापर, नागरिकांनी उच्च दाब वीजवाहिनीची काळजी कशी घ्यावी, सेवा पंधरवड्यात राबविलेले विविध सामाजिक उपक्रम, महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी सुरळीत वीजपुरवठ्यासाठी केलेली कामगिरी, ड्रोनच्या सहाय्याने दुर्गम भागात अखंड वीजपुरवठ्यासाठी केलेली कामगिरी हे फिल्ममध्ये अॅनिमेशनचा वापर करून दाखविले आहे. या फिल्मची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment