राज्यातील विद्यापीठांना राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर अग्रस्थानी आणावे
-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
· एनआयआरएफ रँकिंग सुधारण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहण्यावर भर द्यावा,
मुंबई, दि. २५:-"महाराष्ट्रातील विद्यापीठांनी नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅकिंग फ्रेमवर्क रँकिंग सुधारण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहण्यावर भर द्यावा. राज्यातील विद्यापीठे राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर अग्रस्थानी आणण्यासाठी सर्व विद्यापीठांनी प्रयत्न करावेत",असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विद्यापीठांचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मानांकन उंचवण्यासाठी आणि राज्यस्तरीय एसआयआरएफ पोर्टल विकसित करण्यासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक झाली.
राज्यातील विद्यापीठांनी एनआयआरएफ तसेच जागतिक रँकिंगमध्ये उंच भरारी घेण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर यावेळी चर्चा झाली. विद्यापीठांनी संशोधनाची गुणवत्ता वाढवणे, विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढवणे, दर्जेदार शिक्षण देणे, आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवणारी संशोधन प्रकाशित करणे, तसेच नॅक (एनएएसी) मानांकन सुधारण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश उच्च् व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.
No comments:
Post a Comment