Wednesday, 26 November 2025

समाजप्रबोधन आणि राष्ट्र उभारणीत संतांचे योगदान मोठे

 समाजप्रबोधन आणि राष्ट्र उभारणीत संतांचे योगदान मोठे

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

छत्रपती संभाजीनगरदि.२५(जिमाका)- समाजप्रबोधन व राष्ट्राच्या उभारणीत संतांचे मोठे योगदान आहे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेरुळ येथे केले.

            संत जनार्दनस्वामी यांच्या वेरुळ येथील आश्रमात  ॐ जगद्गुरू जनशांती धर्म या सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली. संत शांतीगिरी महाराज यावेळी उपस्थित होते. यावेळी आमदार. संजय केणेकरआ. प्रशांत बंबसुरेश चव्हाणके आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ७५१ कुंड यज्ञशाळा प्रवेश सोहळा तसेच भगवान शिव मूर्तिचे पूजन व उदघाट्न करण्यात आले. संत नागेश्वरानंद आणि संत अवीमुक्तेश्वरानंद स्वामी यांनी फडणवीस यांचे स्वागत केले.

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीसंत शांतीगिरी महाराजांच्या अनुग्रहाने लाखो लोकांचे जीवन बदलले. देश प्रगतीपथावर नेण्याचे सामर्थ्य संतांच्या मार्गदर्शनात आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi