Thursday, 13 November 2025

‘एआय’ साधनांच्या स्मार्ट वापरामुळे बातमी लेखन, संशोधन आणि विश्लेषण अधिक प्रभावी

 ‘एआय’ साधनांच्या स्मार्ट वापरामुळे बातमी लेखन,

संशोधन आणि विश्लेषण अधिक प्रभावी

- एआय तज्ज्ञ किशोर जस्मानी

मुंबईदि. 12 : पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधनांचा योग्य वापर केल्यास बातमी लेखनसंशोधन आणि विश्लेषण अधिक प्रभावी करता येतेअसे मत ‘एआय’ तज्ज्ञ किशोर जस्मानी यांनी केले.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालय येथे प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासंदर्भात प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आलेत्यावेळी जस्मानी यांनी मत व्यक्त केले.

‘एआय’ तज्ज्ञ किशोर जस्मानी म्हणाले कीओपन एआयजेमिनी आणि को-पायलट ही तीन प्रमुख एआय टूल्स पत्रकारांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. तसेच क्लॉडडीपसिक आणि परप्लेक्सिटी ही आणखी तीन प्रभावी टूल्स आहेत. प्रत्येक टूल्सचा वापर आवश्यकतेनुसार आणि उद्दिष्टानुसार करावा. जेमिनी संशोधनासाठी विशेषतः उपयुक्त आहेतर डीपसिक उत्तरे देण्यात अधिक प्रभावी ठरते. मात्रमेटा एआय हे पत्रकारितेसाठी तेवढे परिणामकारक नाहीअसे त्यांनी नमूद केले

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi