Thursday, 13 November 2025

बिंग, को-पायलट, गूगल बार्ड, जेमिनी आणि परप्लेक्सिटी ही साधने संशोधनासाठी, तर चॅटजीपीटी, गूगल बार्ड आणि जेमिनी ही प्रभावी लिखाणासाठी

 किशार जस्मानी यांनी स्पष्ट केले कीबिंगको-पायलटगूगल बार्डजेमिनी आणि परप्लेक्सिटी ही साधने संशोधनासाठीतर चॅटजीपीटीगूगल बार्ड आणि जेमिनी ही प्रभावी लिखाणासाठी उपयुक्त आहेत. ही टूल्स समस्या सोडविणे आणि सल्ला देणे यासाठीही पत्रकारांना मदत करू शकतात.

प्रत्येक ‘एआय’ टूल्सचा परिणाम ज्ञानप्रॉम्प्टिंग कौशल्य आणि तर्कशक्ती या तीन घटकांवर अवलंबून असतो. प्रॉम्प्टिंगचे तीन प्रकारशून्य शॉटसंदर्भाधारित आणि भूमिकाधारित यांचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले. तसेच पत्रकारितेतील लेखन अधिक परिणामकारक करण्यासाठी ग्रामर्ली हे अ‍ॅपही उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.

किशोर जस्मानी यांनी चॅटजीपीटी या साधनाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही दाखविले. त्यांनी सांगितले कीफोटो आणि योग्य प्रॉम्प्ट दिल्यानंतर चॅटजीपीटी त्या आधारे वृत्तपत्रीय बातमी तयार करून देते. मात्र यासाठी योग्य प्रॉम्प्ट देणे अत्यावश्यक आहे.

त्याचप्रमाणे चॅटजीपीटीवर आवाज रेकॉर्ड करून हवे त्या भाषेत लेखन करून घेता येतेतसेच व्हॉईस डिक्टेटद्वारेही हे टूल्स पत्रकारांना सहाय्य करते. या प्रक्रियेतून त्यांनी प्रॉम्प्टडिक्टेट आणि डिस्कशन अशा तीन प्रकारची प्रात्यक्षिके करून दाखविली.

‘एआय’ टूल्स हस्तलिखित प्रतीवरून स्वयंचलितपणे टंकलेखन करू शकतात. पीडीएफ स्वरूपातील मजकूर चॅटजीपीटीच्या मदतीने कसा उपयोगात आणता येऊ शकतोयाचे सविस्तर मार्गदर्शनही त्यांनी केले.

या प्रशिक्षण सत्रात उपस्थित पत्रकारांनी ‘एआय’ साधनांचा वापर करून प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे सराव केला आणि संवादात्मक पद्धतीने मार्गदर्शन घेतले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi