राज्यातील औषध निर्मिती उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढ होईल, स्टार्टअप्सना मार्गदर्शन, प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होतील. रोजगार निर्मिती होईल. जागतिक दर्जाच्या औषधे उत्पादनांसाठी परिपूर्ण संशोधन संस्था म्हणून ही संस्था काम करेल. असेही श्री झिरवाळ यांनी सांगितले.
बैठकीत अन्न सुरक्षा, गुण नियंत्रण व दक्षता शाखेचे अधिकारी उपस्थित होते. या इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटरमुळे राज्यातील आरोग्य, औषधनिर्मिती व बायोटेक क्षेत्रातील नाविन्याचा जागतिक केंद्रबिंदू बनण्यास मोठी गती मिळेल.यातून नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना मिळणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
No comments:
Post a Comment