बॅकिंग क्षेत्रात अधिक पारदर्शकतेसाठी
डी-डुप्लिकेशन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे
- जिल्हाधिकारी आंचल गोयल
मुंबई, दि.२१ : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने राबविण्यात येत असलेला ‘तुमचे पैसे, तुमचा हक्क’ हा उपक्रम निष्क्रिय खात्यांमधील रक्कम संबधित खातेदारास, त्यांच्या वारसांना विनासायास परत मिळण्यासाठी उपयुक्त असून सर्वच बँकांनी या उपक्रमाची अधिकाधिक जनजागृती करावी. तसेच बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता वाढविण्यास आणि ग्राहक सेवेत सुधारणा घडवून आणण्यास सर्व बँकांच्या माहिती तंत्रज्ञान विभागांनी भारत निवडणूक आयोगाच्या धर्तीवर डी-डुप्लिकेशन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले.
बँक ऑफ बडोदा या जिल्हा अग्रणी बँकेमार्फत मुंबई शहर जिल्ह्यामध्ये हक्क न सांगितलेल्या मालमत्तेचा निपटारा याविषयी यशवंतराव चव्हाण सेंटर सभागृहात आयोजित शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाप्रबंधक पुनित पांचोली, बँक ऑफ बडोदाचे महाप्रबंधक सुनील शर्मा, कॅनरा बँकेचे मुख्य महाप्रबंधक रणजीव कुमार, बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाप्रबंधक सुनील शर्मा, युनियन बँकेचे महाप्रबंधक शलजकुमार सिन्हा, पंजाब नॅशनल बँकेच्या महाप्रबंधक श्रीमती भुवनेश्वरी, युको बँकेचे महाप्रबंधक संदीप कुमार यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी, खातेदार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment