Saturday, 22 November 2025

नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद · २३ नोव्हेंबर पर्यंत प्रदर्शनाचे आयोजन

 नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

·        २३ नोव्हेंबर पर्यंत प्रदर्शनाचे आयोजन

 

मुंबईदि. २१: भारतीय न्यायसंहिताभारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय पुरावा कायदा या नवीन फौजदारी कायद्यांवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन आझाद मैदान येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये २५ मिनिटे कालावधीच्या नाट्यातून प्रात्यक्षिकाद्वारे नवीन कायदे विस्तृतपणे समजावून सांगण्यात आले आहे. या वैविध्यपूर्ण प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हे प्रदर्शन रविवार २३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजे दरम्यान खुले राहणार आहे.

 

प्रदर्शनामध्ये मुख्य नियंत्रण कक्षपोलीस ठाणेन्याय सहाय्यक प्रयोगशाळा संचालनालयन्याय वैद्यक व विष शास्त्र विभागअभियोग संचालनालयनगर दिवाणी व सत्र न्यायालयउच्च न्यायालय आणि मध्यवर्ती कारागृह यांची दालने आहेत. या नवीन कायद्यातील कलमानुसार आरोपीला कशा पद्धतीने शिक्षा ठोठावण्यात येतेयाचे प्रात्यक्षिकाद्वारे सादरीकरण करण्यात आले आहे.

 

 प्रदर्शनामध्ये विविध कलमांच्या माहितीचे पोस्टर्स आकर्षक रंगसंगतीने दाखविण्यात आले आहेत.

प्रदर्शनात केवळ सादरीकरणच नाहीतर कायद्याविषयी अधिक सखोल माहिती मिळण्यासाठी १० प्रश्नांच्या दोन मिनिटे कालावधी असलेल्या डिजिटल स्वरूपातील प्रश्नावलीच्या स्क्रीन्स ठेवण्यात आल्या आहेत. या स्क्रीनवर नागरिक प्रश्नांची उत्तरे देऊन या कायद्यासंबंधित अधिक माहिती जाणून घेत आहेत. तसेच प्रदर्शनाबाबत डिजिटल स्वरूपात प्रतिसाद देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. कारागृहांमध्ये कैद्याकडून निर्मित वस्तूंचे स्टॉल्सही या ठिकाणी आहेत.

 

प्रदर्शनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन या नवीन फौजदारी कायद्याविषयी माहिती करून घ्यावी. विशेषत्वाने विद्यार्थीविधिज्ञविधि शाखेचे विद्यार्थीन्यायालयीन कर्मचारी यांनी भेट द्यावीअसे आवाहन गृह विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi