प्रशासनातील पारदर्शकता आणि जबाबदारी अत्यावश्यक
-राज्य मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे
· भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांचा
राज्य मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्याशी संवाद
मुंबई, दि,२१ : भारतीय प्रशासकीय सेवेतील २०२४ च्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी राज्य मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांची मुख्य माहिती आयुक्त कार्यालयात भेट घेऊन संवाद साधला. या भेटीदरम्यान श्री. राहुल पांडे यांनी माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीमुळे शासन व्यवस्थेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढीस लागल्याचे सांगितले.
राज्य मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे म्हणाले, महाराष्ट्र राज्यात इतर राज्यांप्रमाणे एकच आयोग नसून प्रत्येक महसूल विभागासाठी स्वतंत्र माहिती आयोग कार्यरत आहे. यामुळे नागरिकांना विभागीय पातळीवरच माहिती मिळविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
No comments:
Post a Comment