अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले, देशातील गुजरात, आंध्र प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणी संशोधन केंद्र उभी राहत असून औषधांसंदर्भात जैविक व रासायनिक संशोधनासाठी फॉर्म्युलेशन लॅबची सार्वजनिक–खासगी भागीदारीतून देखील उभारणी केली जात आहे. या केंद्राचे मुख्य उद्दिष्ट औषधनिर्माण (Pharma), बायोटेक, मेडिकल उपकरणे, डायग्नोस्टिक्स आणि डिजिटल हेल्थ क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना आधुनिक सुविधा, तांत्रिक मार्गदर्शन तसेच निधी उपलब्ध करुन देणे असणार आहे.
यातून राज्यातील औषध निर्मिती उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढ होईल, स्टार्टअप्सना मार्गदर्शन, प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होतील. रोजगार निर्मिती होईल. जागतिक दर्जाच्या औषधे उत्पादनांसाठी परिपूर्ण संशोधन संस्था म्हणून ही संस्था काम करेल. असेही श्री झिरवाळ यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment