औषध क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संशोधन आणि विकासासाठी
सुविधायुक्त भव्य केंद्र उभारणार
-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ
मुंबई, दि. २५:- आरोग्य विज्ञानासाठी जैवतंत्रज्ञान महत्त्वपूर्ण ठरत असून औषध क्षेत्रातील अशा नावीन्यपूर्ण संशोधन आणि विकासासाठी (लाईफ सायन्सेस इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर) सुविधायुक्त भव्य केंद्र उभारण्यासाठी कार्यवाही केली जाईल. असे इनोवेशन पार्क ही काळाची गरज असून याच्या उभारणीतून महाराष्ट्र नावीन्यपूर्ण औषध निर्मिती क्षेत्रात आघाडीवर राहील, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment