Monday, 17 November 2025

कुकडी कालव्याचे अस्तरीकरण आणि दुरुस्ती करून पाणी उपलब्धता

 जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणालेकुकडी कालव्याचे अस्तरीकरण आणि दुरुस्ती करून पाणी उपलब्धता वाढवता येईल. यामुळे पाणी गळती देखील कमी होईल. माणिकडोह धरणामध्ये अधिक पाणी आणण्यासाठी जलबोगदा करण्याबाबत योजना, पाणी कुकडी कालव्याद्वारे करमाळ्यास आणून येथील बंधारे व धरणामध्ये साठवणे या दृष्टीने उपाययोजनांबाबत आढावा यावेळी घेण्यात आला.           ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणालेकरमाळा तालुक्यात सिंचनासाठी पाणी उपलब्धता कमी असून जल नियोजनानुसार 5.28 टीएमसी पाणी उपलब्ध करण्यासाठी उपाययोजना आवश्यक आहेत. सद्यस्थितीमध्ये जास्तीत जास्त पाणी यादृष्टीने विभागाने काम करावे. उजनी धरणातील पाणी वाटप नियोजन यापूर्वीच निश्चित झालेले असून त्याऐवजी डिंभे धरणातून माणिकडोह मध्ये पाणी उपलब्ध करून देता येईलयासह इतर पर्याय तपासून तातडीने कार्यवाही करावी. या दृष्टीने सर्वेक्षण करून अभ्यासपूर्ण अहवाल सादर करण्यात यावा45 दिवसात कार्यवाही केली जावी.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi