करमाळा तालुक्यात सिंचनासाठी पाणी उपलब्धतेसंदर्भात आढावा बैठक
मुंबई, दि. 11:- करमाळा तालुक्यात सिंचनासाठी जलनियोजनानुसार पाणी उपलब्ध होण्यासाठी कुकडी कालवा दुरुस्ती करणे व जलबोगदयाद्वारे माणिकडोह धरणामध्ये अधिक पाणी सोडणे गरजेचे असल्याने या दृष्टीने उपाययोजना करण्यात येतील, असे जलसंपदा मंत्री, गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ, राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
मंत्रालयात रिठेवाडी उपसा सिंचन योजनेबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थित होत.
यावेळी आमदार नारायण आबा पाटील, जलसंपदा विभागाचे सचिव डॉ संजय बेलसरे, सहसचिव अलका आहेरराव, मुख्य अभियंता चोपडे, तसेच लाभ क्षेत्रातील संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले, कुकडी कालव्याचे अस्तरीकरण आणि दुरुस्ती करून पाणी उपलब्धता वाढवता येईल. यामुळे पाणी गळती देखील कमी होईल. माणिकडोह धरणामध्ये अधिक पाणी आणण्यासाठी जलबोगदा करण्याबाबत योजना, पाणी कुकडी कालव्याद्वारे करमाळ्यास आणून येथील बंधारे व धरणामध्ये साठवणे या दृष्टीने उपाययोजनांबाबत आढावा यावेळी घेण्यात आला.
No comments:
Post a Comment