रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाप्रबंधक पांचोली म्हणाले, निष्क्रिय खात्यांमधील रक्कम संबंधित व्यक्तीला सुपूर्द करणे महत्वाचे आहे. ते म्हणाले अलीकडच्या काळात सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण पाहता अशा निष्क्रिय खात्यांचा दुरुपयोग होण्याची भीती असते. त्यामुळे खातेदारांनी आपली बँक खाती सक्रिय ठेवण्यासाठी वेळोवेळी केवायसी, ई केवायसी करावी.
यावेळी बँक ऑफ बडोदाचे महाप्रबंधक सुनील शर्मा, बँक ऑफ इंडियाचे महाप्रबंधक सुनील शर्मा आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या उप महाप्रबंधक ज्योती सक्सेना यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात प्रतिनिधीक स्वरूपात निष्क्रीय खात्यांच्या दावा प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. बँक ऑफ बडोदा जिल्हा अग्रणी प्रबंधक उत्तम गुरव यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment