Wednesday, 26 November 2025

गोराई पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय विकासकांना सहभागी करून घ्या

 गोराई पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी

आंतरराष्ट्रीय विकासकांना सहभागी करून घ्या

                                                 -पर्यटन मंत्री शंभुराज देसाई

 

मुंबई,दि.24 : गोराई येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुमारे 128 एकर जमिनीचा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन स्थळाप्रमाणे विकास केला जाणार असूनयाबाबतचा आढावा  पर्यटनखनिकर्म तथा माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला. यासंदर्भातील सर्व प्रलंबित कामे वेगाने मार्गी लावण्याचे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज  देसाई यांनी यावेळी दिले.

            मेघदूत या निवासस्थानी गोराई प्रकल्पाबाबतचा आढावा घेताना पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. या बैठकीला पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेपर्यटन विभागाचे संचालक डॉ.बी.एन.पाटीलमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणेउपसचिव विजय पोवार आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi