Saturday, 1 November 2025

पर्यावरणस्नेही बसेसमुळे मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासह पर्यावरणाचे रक्षण

 पर्यावरणस्नेही बसेसमुळे मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासह पर्यावरणाचे रक्षण

-- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'बेस्टच्या ताफ्यात पर्यावरणस्नेही १५० बस सामील

 1.9 लाख मुंबईकर प्रवाशांना दररोज मिळेल दर्जेदार प्रवासाचा अनुभव

मुंबईदिनांक 28 : ‘बेस्ट’च्या ताफ्यात भविष्यात 100 टक्के पर्यावरणस्नेही बसेस असणार आहेत त्यापैकी 150 बस देण्यात आल्या. मुंबईकरांच्या सुखकर प्रवासाची सोय करतानाच या नवीन पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बसेसमुळे पर्यावरणाचे देखील रक्षण होणार आहे. 'बेस्टही मुंबईची जीवनवाहिनी असून उपनगरीय लोकल रेल्वेमेट्रो ट्रेन यांना प्रवाशांशी जोडण्यासाठी बस सेवा महत्त्वाची आहे. या बसेसमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत होत आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

        बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (BEST)च्या कुलाबा येथील आगारात मुख्यमंत्री  फडणवीस यांचे हस्ते 150 नवीन इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरकौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढासांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलारमुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, 'बेस्ट'च्या महाव्यवस्थापक सोनिया सेठीअतिरिक्त महाव्यवस्थापक आर. आर. डुबल व ए.एस. राव मुख्य अभियंता राजन गंदेवारमुख्य वाहतूक व्यवस्थापक रमेश मडावी उपस्थित होते.

      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेपर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने 5 हजार बसेस घेण्याचा निर्णय पूर्वीच झाला आहे. त्या टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जात आहेत.  मुंबई वन ॲपच्या माध्यमातून सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी  'सिंगल तिकीट सिस्टीमआणण्यात आली आहे. प्रवासी भाड्याचे उत्पन्न  जास्त असेल तर बेस्ट आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. यासाठी हे उत्पन्न जास्तीत जास्त वाढविण्यासाठी काम केले जावेअधिक व्यावसायिक दृष्टिकोन आणला जावा. 'बेस्टसक्षमीकरणासाठी राज्य शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका तत्पर आहेचअसा आश्वासक दिलासा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi