समृद्धी मार्गालगतच एक्सएसआयओ हा 700 कोटी गुंतवणूकीचा लॉजिस्टिक पार्क हा जागतिक दर्जाचा पार्क उभारला आहे. आज 105 एकरावरील दुसऱ्या टप्प्यातील 1100 कोटी गुंतवणूकीच्या उद्देशाने तयार करण्यात येणाऱ्या लॉजिस्टिक पार्कचे भूमिपूजन झाले आहे. या दोन्ही टप्प्यातून जवळपास 10 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. ही आनंदाची बाब असून उद्योग क्षेत्रातील वस्तूंना देशांतर्गत तसेच जागतिकस्तरावर पोहविण्यासाठी राज्य शासन आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटीबद्ध असुन समृद्धी मार्गावरील इगतपुरी भागातून वाढवण बंदरापर्यंत जोडण्याचे काम सुरू आहे. उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी शासन लॉजिस्टिकचा आणि ब्लॉकचेन ची सांगड घालून या क्षेत्रात सकारात्मकबदल घडविण्याच्या दृष्टीने कार्य करत आहे. एक्सएसआयओ राज्यात पाच हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याने राज्याच्या आर्थिक विकासात मोलाचे योगदान ठरेल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
No comments:
Post a Comment