Wednesday, 1 October 2025

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एईडी डीफ्रेबिलिटर्स, स्टेमी उपकरणांचे लोकार्पण जागतिक हृदय दिनानिमित्त मंत्रालयात कार्यक्रम

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एईडी डीफ्रेबिलिटर्सस्टेमी उपकरणांचे लोकार्पण

जागतिक हृदय दिनानिमित्त मंत्रालयात कार्यक्रम

 

            मुंबई दि. ३० :- आजच्या धकाधकीच्या आयुष्यात सर्वांनी आपल्या जीवनशैलीत बदल केला पाहिजे. नियमित व्यायामसंतुलित आहारतणाव कमी करणे आणि नियमित तपासण्याद्वारे आपण हृदयरोगापासून आपला बचाव करु शकतो असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

जागतिक हृदय दिनाचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंत्रालयातील समिती कक्षात ट्रायकॉग हेल्थ इंडिया या संस्थेच्या वतीने मंत्रालयातील दवाखान्यासाठी देण्यात आलेल्या ५ एईडी डीफ्रेबिलिटर्स आणि स्टेमी उपकरणाचे लोकार्पण करण्यात आले. 

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफसार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरवैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमारसार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंहउपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुखट्रायकॉग हेल्थ इंडियाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चरित भोगराजवैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारीआरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडेट्रायकॉग हेल्थ इंडियाचे परेश शिंदेराजीव दासउपमुख्यमंत्र्यांचे सहसचिव डॉ. संतोष भोसलेमंत्रालयातील क्लिनिकचे डॉ. प्रमोद निकाळजे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेजागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी सुमारे १८ दशलक्ष लोक हृदयरोगामुळे मृत्यू पावतात. भारतातही ही समस्या गंभीर आहे. वाढती व्यसनाधीनतातणावअसंतुलित आहारव्यायामाचा अभाव आणि बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णाला तत्काळ वैद्यकीय मदत मिळणे आणि त्याला जीवनदान देणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर आज लोकार्पण झालेल्या या उपकरणांचे विशेष महत्व आहे. मंत्रालयात कार्यरत असणाऱ्या ४ हजार कर्मचाऱ्यांपैकी एखाद्याला हृदयविकाराचा त्रास झाल्यास या उपकरणामुळे निश्चितच जीवनदान मिळेलअसा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मंत्रालयातील दवाखान्याचे आधुनिकीकरण करण्याची गरज आहे. ईसीजी व रक्त तपासणीसाठी रुग्णांना मंत्रालयाबाहेर जाण्याची गरज भासू नयेयासाठी आरोग्य विभागाने व्यवस्था करावी. त्यासाठी आवश्यक साधनसामुग्रीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाहीअशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

ट्रायकॉग हेल्थ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चरित भोगराज यांनी यावेळी स्टेमी उपकरणासंदर्भात सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उपमुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव अविनाश सोलवट यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi