महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया स्किल्स हब उभारणीमुळे
शिक्षण-उद्योग सहकार्यास नवी दिशा मिळणार
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
मुंबई, दि. ३० : राज्यातील औद्योगिक व शैक्षणिक परिसंस्थेला ऑस्ट्रेलियन कौशल्यांशी जोडून परिवर्तनशील शिक्षण, संशोधन व उद्योग सहकार्यासाठी महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया इनोव्हेशन अँड स्किल्स हब उभारण्यात येणार आहे. या हबच्या माध्यमातून ऊर्जा, पर्यावरण आणि आरोग्य क्षेत्रात संशोधन, नवकल्पना व कौशल्यविकासाला चालना मिळणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
आज मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली इनोव्हेशन अँड स्किल्स हबबाबत बैठक झाली. या बैठकीला उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, ऑस्ट्रेलियामधील न्यू कॅसल विद्यापीठाचे प्रा. डॉ. अजयन विनू , डी. वाय.पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी.पाटील, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, डॉ होमी भाभा स्टेट विद्यापीठाचे कुलगुरू रजनीश कामत, सहसचिव संतोष खोरगडे, उपसचिव प्रताप लुबाळ, तसेच अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment