महाराष्ट्र आता ‘क्वांटम कॉरिडॉर’ च्या नकाशावर
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘क्वांटम कॉरिडॉर’ स्थापनेसाठी आयओएनक्यू (अमेरिका) आणि स्कैंडियन एबी (स्वीडन) यांच्याशी महाराष्ट्राचा त्रिपक्षीय करार
मुंबई, दि. १६ : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम कॉम्प्युटिंग माध्यमातून महाराष्ट्राला तंत्रज्ञानातील जागतिक नकाशावर नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन, अमेरिकेची आयओएनक्यू आणि स्वीडनची स्कैंडियन एबी या दोन नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला. या कराराच्या माध्यमातून महाराष्ट्र आता क्वांटम कॉम्प्युटिंग नकाशावर येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजच्या जगात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम कॉम्प्युटिंग हे जागतिक अर्थव्यवस्थेचे दोन प्रमुख स्तंभ बनले आहेत. महाराष्ट्र शासनाला ‘क्वांटम कॉरिडॉर’ स्थापनेसाठी भागीदारी करताना अभिमान वाटतो. हा उपक्रम राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवेल. शासन या प्रवासात सर्वतोपरी सहकार्य करेल आणि उद्योगांना अखंड वाढीसाठी सुलभ वातावरण उपलब्ध करून देईल.
No comments:
Post a Comment