Monday, 20 October 2025

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र कायम ‘एक नंबर’ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

 उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र कायम एक नंबर’ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांचे वितरण

 

मुंबईदि. 13 : महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात कायमस्वरूपी एक नंबर’ वर ठेवण्यासाठी जे काही करावे लागेलती सर्व ताकद उद्योजकांना देण्याची राज्य शासनाकडून तयारी आहेअशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

2022 - 23 आणि 2023- 24 या वर्षांकरिता "महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार 2025" चे वितरण  मराठी भाषा व उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या पुरस्कार वितरण समारंभात उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीनकुमार सोनाउद्योग सचिव डॉ. पी अन्बळगनमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंदर सिंहउद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाहअतिरिक्त विकास आयुक्त वैभव वाघमारे तसेच पुरस्कार विजेते निर्यातदार उद्योजक उपस्थित होते.

उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत म्हणाले कीराज्याच्या निर्यातीचे गुणोत्तर दहा पटीने वाढवण्यासाठी 12 नवीन धोरणे आणली जात आहेत. यात एव्हीजीसीजीसीसीबांबूलेदरएरोस्पेसइलेक्ट्रॉनिक्स यासारखी धोरणे लवकरच येणार आहेत. या धोरणांमुळे उद्योजकांना दिलासा मिळेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दावोसजर्मनीजपान यासारख्या परदेश दौऱ्यांतील कराराद्वारे महाराष्ट्रात विक्रमी गुंतवणूक वाढल्याचे सांगत उद्योग मंत्री डॉ.सामंत म्हणाले कीदावोस येथे पहिल्या वर्षी 1.70 लाख कोटीदुसऱ्या वर्षी 7 लाख कोटी तर तिसऱ्या वर्षी 16 लाख कोटी रुपयाचे विक्रमी सामंजस्य करार झाले. या सामंजस्य कराराच्या 80 टक्के अंमलबजावणीसह महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचा अभिमान त्यांनी यावेळी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi