Wednesday, 29 October 2025

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील लाभाच्या उपक्रमांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ हवामानानुसार पिकांच्या फेरपालटाचा समन्वय साधणारा प्रकल्प

 वृत्त क्र. ४१६१

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील लाभाच्या उपक्रमांचा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

हवामानानुसार पिकांच्या फेरपालटाचा समन्वय साधणारा प्रकल्प

- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

  • राज्यातील 21 जिल्ह्यांतील 7,201 हून अधिक गावांमध्ये प्रकल्पाची अंमलबजावणी होणार

 

मुंबईदि.२८ : हवामान बदलाचे अनेक परिणाम राज्यातील शेतीवर होत असून शेतकरी वर्गाला मोठा फटका बसत आहे. अशा परिस्थितीत बदलत्या हवामानाला तोंड देत शेती अधिक किफायतशीर करण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करणे गरजेचे असल्याचे महाराष्ट्र शासनाने जागतिक बँकेच्या सहकार्याने कृषी विभागाच्या माध्यमातून हवामान अनुकूल शेती विकासाचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प  राबविण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि शेतकरी गटांना लाभ देण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या डीबीटी प्रणालीचे अनावरण करून प्रकल्पातील उपक्रमांचा शुभारंभ  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेउपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारकृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi