Wednesday, 29 October 2025

वेगाने होत असलेल्या हवामान बदलामुळे राज्यातील शेतीवर प्रतिकूल परिणाम

 वेगाने होत असलेल्या हवामान बदलामुळे राज्यातील शेतीवर प्रतिकूल परिणाम होत असून  पिकांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. राज्यातील ८२ % जमीन कोरडवाहू असल्यामुळे पिकांच्या वाढीच्या अवस्थेत पडणारा पावसातील खंड पिकांच्या उत्पादकतेवर प्रतिकूल परिणाम करतो. त्याबरोबरच अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे आणि पिकांचे मोठे नुकसान होते. या सगळ्याचा फटका सर्वच शेतकऱ्यांना आणि विशेषतः अल्प व अत्यल्प भूधारकांना सहन करावा लागतो.  वाढते तापमानअनियमित पाऊसतीव्र टंचाईअतिवृष्टीअवकाळी पाऊस आणि दिवसेंदिवस कमी होत असलेली जमीनधारणा यामुळे शेतीमधील जोखीम वाढली आहे.  अशा प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीशी सामना करण्यासाठी शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढविण्याबरोबरच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे अत्यावश्यक झाले आहे. त्याबरोबरच युवक व महिलांचा शेतीव्यवसायाच्या निर्णयप्रक्रियेमध्ये सहभाग वाढविणे गरजेचे झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जागतिक बँकेच्या सहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याचे ठरवले आहे.  

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi