नवीन नागपुरातील रस्ते बाह्यवळण मार्गाला जोडावे
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· नागपूर महानगर प्राधिकरणाच्या मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी कंपनी स्थापण्यास मान्यता
मुंबई, दि. 20 :- नवीन नागपूरमधील रस्ते बाह्यवळण मार्गाला जोडण्यात यावे. तसेच हा बाह्यवळण मार्ग भविष्यात मल्टिमॉडल कॉरिडॉरमध्ये रुपांतरित करण्यासाठी आतापासूनच त्यामध्ये योग्य ती तरतूद करून ठेवावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्या मालकीच्या असलेल्या तसेच भविष्यात निर्माण होणाऱ्या मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र असेट मॅनेजमेंट कंपनी स्थापन करण्यास नागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
नागपूर महानगर विकास प्राधिकरणाची दहावी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्राधिकरणाचे महानगर आयुक्त संजय मीना, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment