पुणे ग्रँड टूरमुळे पुण्यातील पर्यटन वाढेल ;
सायकलचे शहर ही जुनी ओळख पुन्हा प्रस्थापित होईल
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’चे बोधचिन्ह आणि जर्सीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
पुणे, दि. २९ : ‘बजाज पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’ या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या माध्यमातून पुण्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यटनस्थळांचे महत्व अधोरेखित होईल आणि पर्यटकांची संख्या वाढेल. राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल तसेच प्रदूषणावर मात करत पुण्याची “सायकलचे शहर” ही ओळख पुन्हा प्रस्थापित होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राज्य शासन, पुणे जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बजाज पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’ चे बोधचिन्ह व जर्सी अनावरण समारंभात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आशियाई सायकलिंग महासंघाचे अध्यक्ष दातो अमरजीत सिंग गिल, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग, आशियाई सायकलिंग महासंघाचे माजी महासचिव ओंकारसिंग, मुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment