Friday, 31 October 2025

पाणंद रस्ते कामांना गतीसाठी आमदारांच्या समितीला अधिकार

 पाणंद रस्ते कामांना गतीसाठी आमदारांच्या समितीला अधिकार

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. 16 :- शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन कार्यवाही करत असून दिवाळीपूर्वी लाभ देण्यासाठी विविध निर्णय घेण्यात येत आहेत. शेतकरी व ग्रामीण भागासाठी 'बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनामहत्त्वाची आहे. यातील पाणंद रस्ते कामांना गती मिळावी यासाठी आमदारांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या विधानसभा मतदारसंघ स्तरावरील समितीला अधिकार देण्यासाठी तरतूद करण्यात येईलअसे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

            बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना राज्यस्तरीय समितीची बैठक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावलेवित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वालआमदार सर्वश्री संजय बनसोडे, सत्यजित देशमुखदिलीप बनकरसुमित वानखेडेहेमंत पाटीलराजेश क्षीरसागर, विठ्ठल लंगे, अभिमन्यू पवारउमेश यावलकरसमीर कुणावरमहसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगेग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले उपस्थित होते. आमदार रणधीर सावरकर दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

              महसूल मंत्री बावनकुळे म्हणालेविधानसभा मतदारसंघस्तर समितीला योजनेतून करण्यात येणारे रस्ते निश्चित करणे याचे अधिकार देण्यात येईल. यादृष्टीने तरतूद करण्यात येईल. या समितीने रस्त्यांच्या कामांची यादी संबंधित यंत्रणेस द्यावी. सीएसआर व विविध विभागाच्या योजनेतून उपलब्ध होणाऱ्या निधीतून कामे करण्यात येतील. स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यात येईल. पाणंद रस्ते काम करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत देखील कामे करण्यात येतील. यासाठी शासन निर्णय काढण्यात येईल.

             योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध यंत्रणांमध्ये सुसूत्रता व जबाबदारीच्या स्पष्टतेसाठी विविध समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. त्याचे स्वरूप शासन निर्णय नुसार निश्चित करण्यात येईलअसे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

              रोजगार हमी योजना मंत्री गोगावले म्हणालेगाव पातळीवर याची अंमलबजावणी सुरू होत आहे. या अनुषंगाने शेत व पाणंद रस्त्याची कामे गुणवत्ता पूर्ण काम होण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील.

              राज्यमंत्री ॲड. जयस्वाल म्हणालेबळीराजा शेत व पाणंद रस्ते मोहिमेत देखील चांगले काम करण्यात यावे. यादृष्टीने अभ्यापूर्ण तरतुदी करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi