संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत सिम्बायोसिस स्किल्स
अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा सहावा पदवीदान समारंभ
कौशल्य विकासाच्या माध्यमातून समर्थ भारताची उभारणी होणार
- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
पुणे दि.१६: आज जग वेगाने बदलत असून प्रत्येक क्षणाला नवा विचार, नवी व्यवस्था, नवे तंत्रज्ञान समोर येत असताना अशा अनिश्चित जगात आपले कौशल्य आपल्या मदतीला येऊ शकते. त्यामुळे सर्वांनी मिळून कौशल्याच्या माध्यमातून देशाला पुढे नेण्याची गरज आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून समर्थ आणि स्वावलंबी भारताच्या उभारणीसाठी केंद्र सरकारसोबत महाराष्ट्र राज्य शासन देखील कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या सुविधा उभ्या करीत आहे आणि त्यांना प्रोत्साहनही देण्यात येत आहे. सिम्बायोसिस विद्यापीठदेखील या दिशेने काम करत असून नोकरी मिळविण्यासाठी नाही तर नोकरी देण्याची क्षमता निर्माण करणारे शिक्षण येथे देण्यात येत आहे, असे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले.
No comments:
Post a Comment