Thursday, 23 October 2025

इलेक्ट्रिक ट्रकसाठी संपूर्ण क्लिष्ट अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची

 इलेक्ट्रिक ट्रकसाठी संपूर्ण क्लिष्ट अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची संकल्पना आणि निर्मितीतंत्रज्ञान देशातच त्यातही महाराष्ट्र आणि पुण्यात निर्माण होणे ही अभिमानाची बाब आहे. दावोस येथे याबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला होता. त्यानंतर कंपनीने अत्यंत वेगाने प्रकल्प उभारणीचे काम केले आहे. महाराष्ट्र शासनाने ईव्ही क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे धोरण तसेच पर्यायी इंधन धोरण अशी शाश्वत धोरणे स्वीकारली असून या क्षेत्रातील उद्योगाला त्याचा फायदा व्हावा आणि पर्यावरणाचे या माध्यमातून रक्षण व्हावे हे आहे. महाराष्ट्र शासन मुंबई-पुणे इलेक्ट्रीक कॉरिडॉरसाठी तसेच अन्यत्रही बॅटरी स्वॅपिंग आणि चार्जिंगच्या कॉरिडॉरसाठी  ब्ल्यू एनर्जीसोबत काम करेल. या ट्रकच्या किंमती डिझेल वाहनांशी स्पर्धा करणाऱ्या  असल्याने या वाहनांना चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi