दावोस येथील सामंजस्य कराराचे फलित
दावोस येथे जानेवारीत झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत ब्ल्यू एनर्जी कंपनीबरोबर सामंजस्य करार झाला होता. त्या करारानुसार ब्लू एनर्जी कंपनीचा आज प्रकल्प सुरू होत आहे. दावोस येथे झालेले करार प्रत्यक्षात येत आहेत. दहा हजार ट्रक पहिल्या टप्यात तयार होत आहेत.
थोड्याच दिवसात ही संख्या वाढत जाणार आहे. महाराष्ट्र गुंतवणूकदरांचे पहिल्या पसंतीचे राज्य आहे. ब्ल्यू एनर्जी कंपनीचा प्रकल्प सुरू होऊन उत्पादन सुरु झाले आहे आणि रोजगार निर्मिती झाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधोरेखित केले.
प्रास्ताविकात ब्ल्यू एनर्जीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध भुवलकर यांनी कंपनीविषयी माहिती दिली. मालवाहतूकीला पर्यावरणपूरक पर्याय देण्यासाठी देशातील पहिला एलएनजी ट्रक सप्टेंबर २०२२ मध्ये बनविण्यात आली. इलेक्ट्रिक वाहन हे भविष्य असल्याने आणि शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी ईव्ही ट्रकचा शुभारंभ करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी चालवला ट्रक
ब्लू एनर्जी मोटर्सतर्फे निर्मित स्वॅपेबल बॅटरी हेवी इलेक्ट्रिक ट्रक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीच्या आवारात चालविला. नवं तंत्रज्ञान समजून घेताना ते हाताळण्याचे कसबही मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले.
तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ब्लू एनर्जी मोटर्सतर्फे निर्मित भारताच्या पहिल्या स्वॅपेबल बॅटरी असलेल्या हेवी ड्युटी इलेक्ट्रिक ट्रकचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कंपनीच्या मुंबई–पुणे इलेक्ट्रिक कॉरिडॉरचे उद्घाटनही करण्यात आले.
0000
No comments:
Post a Comment