Saturday, 4 October 2025

राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार

 राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

- २०२६ हे पदभरतीचे वर्ष असणार

- मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत अनुकंपा तत्वावरील व लिपिक श्रेणीतील

१० हजार ३०९ उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरण

 

मुंबईदि. ४ : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहेहे लक्षात घेऊन राज्यातील सर्व संवर्गातील पदांच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात येणार आहेअसे सांगून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पदभरती प्रक्रिया गतीशील करून २०२६ या वर्षात मोठ्या प्रमाणात पदभरती करण्यात येणार आहेअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले. शासकीय सेवेत आज नियुक्त झालेल्या सर्व उमेदवारांनी  लोकाभिमुख आणि पारदर्शी पद्धतीने आपले काम करावे असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सामान्य प्रशासन विभागातर्फे अनुकंपा तत्वावरील व लिपिक श्रेणीतील १० हजार ३०९ उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरणाच्या राज्य रोजगार मेळाव्याच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारअन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजलसंपदा (विदर्भ व तापी व कोकण खोरे विकास महा.)आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनशालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेपणनराजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावलमाहिती तंत्रज्ञानसांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलारआमदार परिणय फुकेआमदार अबु आझमीआमदार मनोज जामसुतकरराज्याचे मुख्य सचिव राजेश कुमारअपर मुख्य सचिव इक्बाल सिंहसामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधामुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशीपोलीस महासंचालक रश्मी शुक्लाकोकण विभागीय आयुक्त विजयकुमार सुर्यवंशीमुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार आदी मान्यवर उपस्थित  होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi