Tuesday, 21 October 2025

सामाजिक न्याय मंत्री यांच्याकडून आमदारांना २ कोटींचा विकासनिधी · दलित वस्त्यांतील विकासकामांना मिळणार गती

 सामाजिक न्याय मंत्री यांच्याकडून

आमदारांना २ कोटींचा विकासनिधी

·         दलित वस्त्यांतील विकासकामांना मिळणार गती

 

मुंबईदि. २० : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा सदस्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून प्रत्येकी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून वितरित केला आहे.

 

सामाजिक न्याय विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेद्वारे दलित वस्त्यांमध्ये विविध विकासकामे केली जातात. लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघातील सामाजिक विकासासाठी निधी देण्यात येतो.

 

मागील काही महिन्यांपासून लोकप्रतिनिधींकडून निधीची मागणी होत होती. उपलब्ध निधी आणि मागणी यामध्ये समतोल राखत, सामाजिक न्याय मंत्री श्री.शिरसाट यांनी आमदारांना दोन कोटींचा निधी मंजूर केला आहे.

 

हा निधी वितरित झाल्याने दलित वस्त्यांतील विकासकामांना गती मिळणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री श्री. शिरसाट यांनी सांगितले.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi