बालकलाकारांच्या कल्पकता आणि रंगांमधून दिसले
भारताच्या उज्ज्वल भविष्याचे चित्र
- मंत्री जयकुमार रावल
‘विकसित भारत २०४७’ संकल्पनेवर दोन हजार बाल कलाकारांची सर्जनशील अभिव्यक्ती
मुंबई, दि. १५ :- “सेवापर्व” या उपक्रमाअंतर्गत प्रदर्शनातील बाल कलाकारांच्या सर्जनशीलतेने उपस्थितांना प्रभावित केले आहे. कल्पकतेतून आणि रंगांमधून त्यांनी भारताच्या उज्ज्वल भविष्याचे चित्र रंगवलेले दिसले असून यातून त्यांनी दिलेला देशाच्या प्रगतीचा उत्साहवर्धक संदेश प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
“विकसित भारत २०४७” या विषयावर चित्रकला कार्यशाळा व स्पर्धेचे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (एन.जी.एम.ए.) च्या वतीने आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत झाला यावेळी ते बोलत होते. एनजीएमएच्या संचालक निधी चौधरी तसेच किशोर झुनझुनवाला, यासह विविध मान्यवर, अध्यापक, व्यावसायिक कलाकार, महाविद्यालयीन विद्यार्थी, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री जयकुमार रावल म्हणाले,या कार्यक्रमाने कलेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची गती वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित ‘सेवेला सर्जनशीलतेचा संदेश’ दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या “विकसित भारत २०४७” या दृष्टिकोनातून प्रेरणा घेऊन देशातील प्रत्येक नागरिकाने सेवा, नवोन्मेष आणि राष्ट्रनिर्माणाच्या भावनेने कार्य केले, तर भारत पुन्हा “विश्वगुरू” म्हणून उभा राहील असेही मंत्री रावल म्हणाले.
नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या संचालक निधी चौधरी यांनी प्रास्ताविकात एनजीएमएच्या उपक्रमांद्वारे समाज आणि राष्ट्रविकासात कलेच्या भूमिकेबाबत माहिती दिली.
No comments:
Post a Comment