Thursday, 23 October 2025

महाराष्ट्रात खोल समुद्रातील मासेमारीला नवे बळ

 महाराष्ट्रात खोल समुद्रातील मासेमारीला नवे बळ

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत माझगाव डॉक येथे दोन नौकांचे 27 ऑक्टोबर रोजी उद्घाटन

 

मुंबईदि. १७ : प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खोल समुद्रातील मासेमारीला नवे बळ मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमुंबई येथे अत्याधुनिक खोल समुद्रातील मासेमारी दोन नौकांचे उद्घाटन होणार आहे.

हा उपक्रम राज्यातील समुद्री मत्स्यव्यवसायाच्या आधुनिकीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असूनया प्रकल्पाला राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ यांचे आर्थिक साहाय्य मिळाले आहे. या योजनेचा उद्देश मच्छीमार सहकारी संस्थांची खोल समुद्रातील मासेमारी क्षमता वाढविणेभारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील संसाधनांचा शाश्वत उपयोग प्रोत्साहित करणे आणि मच्छीमारांचे उत्पन्न वाढविणे असा आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi