वृत्त क्र. ४१३७
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणजे एक विचार, एक प्रेरणास्रोत
_ राज्यपाल आचार्य देवव्रत
§ राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या हस्ते लेखक बर्जिस देसाई लिखित
"मोदीज मिशन" पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई, दि. 24 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे केवळ भारताचे नेते नाहीत, तर ते एक विचार आहेत, एक प्रेरणास्रोत आहेत. त्यांचे जीवन हे मानवतेच्या सेवेचे आणि राष्ट्रहितासाठीच्या अखंड समर्पणाचे उत्तम उदाहरण आहे, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.
लेखक बर्जिस देसाई लिखित "मोदीज मिशन" या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, लेखक बर्जिस देसाई तसेच अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या आयुष्यात अनेक अशक्य वाटणारे निर्णय घेतले, जसे कलम ३७० रद्द करणे, रामजन्मभूमीचा प्रश्न शांततेत सोडवणे. तसेच जागतिक स्तरावर भारताचा सन्मान वाढवणे, हे त्यांच्या दृढ इच्छाशक्तीचे द्योतक असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यपाल देवव्रत म्हणाले की, प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या २५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत एकही दिवस सुटी घेतलेली नाही. देश, समाज आणि मानवतेच्या सेवेसाठी सतत कार्य करणे, हीच त्यांची साधना आहे.
राज्यपालांनी लेखक बर्जिस देसाई यांचे अभिनंदन करताना म्हटले की, या पुस्तकात प्रधानमंत्री मोदी यांच्या जीवनातील विविध पैलूंना सखोलतेने स्पर्श केला असून, हे पुस्तक तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. सर्वांनी हे पुस्तक वाचून, त्यातील विचारांद्वारे आपल्या जीवनात प्रेरणा घ्यावी. प्रधानमंत्री मोदी हे देशाच्या सन्मानाचे प्रतीक आहेत; त्यांचे कार्य हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद असल्याचेही राज्यपाल देवव्रत म्हणाले.
No comments:
Post a Comment